गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

रेल्वे बजेट २०१६ –

रेल्वे बजेट २०१६
१.       मुदखेड-परभणी दुहेरीकरना करिता रु. १७० कोटी रुपये मंजूर
२.       अकोला खांडवा-मऊ रतलाम रुंदी कारणाकरिता २५० कोटी रुपये मंजूर
३.       औरंगाबाद स्थानकाच्या नवीन इमारती करिता (दुसरा टप्पा) १ कोटी रुपये मंजूर
४.       औरंगाबाद आणि नांदेड स्थानकांचा पर्यटन स्थानक म्हणून विकास करिता १ कोटी रुपये मंजूर
५.       मनमाड ते मुदखेड दरम्यान रेल्वे पुलांच्या नाविनिकरना करिता १० लाख मंजूर
६.       नांदेड येथे नवीन पिट लाईन करिता ३० लाख मंजूर
७.       जालना आणि सेलू येथे कवर ओवर प्लातफोर्म मंजूर
८.       गेल्या वर्षी सुरु असलेले वाशीम-माहूर आदिलाबाद, नांदेड ते लातूर रोड आणि रोटेगाव ते पुणतांबा  च्या नवीन लाईन च्या सर्वे चे काम या वर्षी सुरूच राहणार
९.       नवीन रेल्वे लाईन चे सर्वे
अ ) औरंगाबाद ते चाळीसगाव (९५ किमी)
ब) बोधन -बिलोली -मुखेड -जळकोट ते लातूर रोड  ( १३० किमी )
क) वाशीम ते नारखेर (२३२ किमी)
ड ) मानवत रोड ते परळी मार्गे सोनपेठ ( २७ किमी )
१०.    दुहेरीकारनाचे सर्वे  - परळी ते परभणी, मनमाड ते परभणी, सिकंदराबाद ते मुदखेड आदिलाबाद या वर्षी सुरु राहणार
११.    पुढील ठिकाणी रेल्वे उडण पुलांना मंजुरी देण्यात आली आहे
अ)     गेट क्र. ११४ आणि गेट क्र. ११५ वाशीम ते कातारोड दरम्यान
आ)   गेट क्र. ५४ औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान
इ)       गेट क्र. ३ हदगाव रोड ते भोकर दरम्यान
ई)       गेट क्र. ९९ सातोना ते सेलू दरम्यान
उ)       गेट क्र. ३० आदिलाबाद स्टेशन यार्ड
ऊ)     गेट क्र. १२२ परभणी ते पिंगळी दरम्यान
ऋ)    गेट क्र. ९२ परतूर स्टेशन यार्ड
ऌ)     गेट क्र. १३४-अ चुडावा ते बसमत दरम्यान
तसेच मुदखेड ते मनमाड दरम्यान, गेट क्र. १६, २१, १०१,१०४, १०७, १०९, ७, १५, १३३, २, २३ आणि गंगाखेड ते पोखरणी नार्सिम्हा दरम्यान गेट क्र. ११, चोंढी ते बसमत दरम्यान गेट क्र. १६३ आणि  जालना यार्ड मधील गेट क्र. ७८ येथे रेल्वे च्या भुयारी पुला करिता मंजुरी देण्यात आली आहे

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

“नांदेड ग्रंथोत्सव 2015” मध्ये लोकराज्य मासिकाचे दालन

 “नांदेड ग्रंथोत्सव 2015 मध्ये
लोकराज्य मासिकाचे दालन
नांदेड दि. 15 :- नांदेड ग्रंथोत्सव 2015 च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शन-विक्रीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकराज्य मासिकाच्या दालनाचाही समावेश आहे. या दालनास विविध मान्यवरांनी भेट दिली.
मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2015 उद्गाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडित विद्यासागर होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गुरु गोबिंदसिंगजी स्टेडियम परिसर येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी येथे हा तीन दिवसीय ग्रंथोत्सव चालणार आहे. ग्रंथमहोत्सवात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचेही प्रदर्शन-विक्री दालन उभारण्यात आले आहे. या दालनास आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, कुलगूरू डॅा. पंडित विद्यासागर, साहित्यीक डॅा. जगदीश कदम, श्रीकांत देशमुख, डॅा. वृषाली किन्हाळकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे आदींनीही भेट दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी स्वागत केले व लोकराज्यविषयी माहिती दिली. माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, छायाचित्रकार विजय होकर्णे, काशिनाथ आरेवार, सी. पी. आराध्ये यांचीही उपस्थिती होती.
लोकराज्य ॲपवरही उपलब्ध..
उद्घाटनपर समारंभात महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर यांनी लोकराज्य मासिक हे ॲपस्वरुपात उपलब्ध असल्याचे आणि त्यामध्ये लोकराज्यच्या पहिल्या अंकापासून ते आतापर्यंतचे सर्व अंक उपलब्ध असल्याची माहिती देऊन, शासनाच्या या उपक्रमाचा अभ्यासू तरूणांना मोठा फायदा होत असल्याचेही नमूद करून या ॲपचे आवर्जून कौतूक केले.

0000000
वाचन संस्कृती तळागाळापर्यंत
पोहचावी - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड ग्रंथोत्सव 2015 चे शानदार उद्घाटन

नांदेड दि. 15 :- शेतकरी, विद्यार्थी वर्गात वाचन संस्कृती रूजेल अशा पद्धतीने ग्रंथनिर्मिती व्हावी. वाचनाची चळवळ तळागाळापर्यत पोहचावी यासाठी ग्रंथ निर्मितीशी निगडीत घटकांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्हा ग्रंथालय संघ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2015 चे उद् घाटन जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.  
अध्यक्षस्थानी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडित विद्यासागर होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गुरुगोबिंदसिंगजी स्टेडियम परिसर येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी येथे हा तीन दिवसीय ग्रंथोत्सव चालणार आहे. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार हेमंत पाटील, माजी महापौर आनंदरराव चव्हाण, महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर तसेच विशेष निमंत्रित म्हणून ज्येष्ठ साहित्यीक डॉ. जगदीश कदम, श्रीकांत देशमुख, डॉ. वृषाली किन्हाळकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती.
ग्रंथप्रदर्शन ग्रंथविक्री असा या ग्रंथेात्सवाचा उद्देश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. नांदेडसह राज्यातील विविध प्रकाशकाची दालने ग्रंथमहोत्सवात आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य या मासिका विषयीचे दालन, औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथागाराचे विशेष दालन या प्रदर्शनात आहेत. ग्रंथ प्रदर्शन व विक्री दररोज सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी खुली राहणार आहे.  
उद्घाटनपर भाषणात पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, आपल्याकडे ग्रंथ चळवळीची मोठी पंरपरा आहे. त्यातून चांगली ग्रंथसंपदा निर्माण केली गेली आहे. संत वाड:मय, अर्वाचीन, प्राचीन, मध्ययुगीन, स्वातंत्र्य चळवळ आणि त्यानंतरचा काळ ते आता जागतिकीकरणाचा प्रवाह यातही साहित्य निर्मिती झाली आहे. त्याकाळी समाजसुधारणेसाठी, समाजाला दीशा देण्यासाठी साहित्य निर्मिती होत असे. आता आपण आधुनिकतेच्या वाटेवर असताना वाचन संस्कृतीचे माध्यम आणि संदर्भ बदलू लागले आहेत. त्यामुळेच वाचनात गोडी निर्माण करणाऱ्या गोष्टींचा ग्रंथनिर्मितीत विचार करायला हवा. आपली कृषीप्रधान व्यवस्था, त्यांना अगदी मृद, जलसंधारण तसेच पीक पद्धतीबाबत मार्गदर्शक ठरणाऱ्या माहितीपर लेखनापासून ते विद्यार्थ्यांना मुळ साहित्यवाचन आणि पुढे त्याचा परीक्षांसाठीचा संदर्भ यासाठी कसा वापर करता येईल या दृष्टीने साहित्य निर्मिती व्हावी. शेतकरी आणि विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून ही निर्मिती व्हावी. त्यातून वाचनसंस्कृती तळागाळापर्यंत पोहचविता येईल, अशी अपेक्षा आहे.
आयुक्त श्री. खोडवेकर यांनी महापालिकेच्यावतीने वाचनसंस्कृती वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न, ग्रंथालयांसाठीच्या पायाभूत सुविधा, वाचनकट्टे आदींबाबतची माहिती आपल्या भाषणात दिली. डॅा. किन्हाळकर यांनी नांदेडच्या समृद्ध लेखन परंपरेचा उल्लेख करतानाच, वाचनसंस्कृती वाढीस लागण्याने लेखकांचा आणि पर्यायाने त्यांनी निर्माण केलेल्या शब्दांचा, साहित्यकृतींचा सन्मान होतो. त्यासाठी वाचलेच पाहिजे, असा आग्रह धरला.
आमदार श्री. पाटील यांनीही वाचनसंस्कृती तीही नव्या पिढीत रुजवण्यासाठीच्या प्रयत्न व्हावेत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 
अध्यक्षीय समारोपत कुलगुरु डॅा. विद्यासागर म्हणाले की,  ज्ञानाधिष्ठीत समाजाच्या निर्मितीत वाचनाचे मोठे महत्त्व आहे. वाचनातूनच प्रगल्भता येते. मेंदुच्या क्षमताचा विकास होतो. त्यामुळे मानवी जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी ग्रंथ वाचन व्हायलाच हवे.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयशास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथराज प्रतिकृतीचे पूजन झाले. तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी प्रास्ताविक केले. निर्मल प्रकाशनच्यावतीने डॅा. पृथ्वीराज तौर यांच्या खजिना-आनंदकथाचा या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. कार्यक्रमास समन्वय समितीचे सदस्य शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, प्रकाशक संघटनेचे निर्मलकुमार सुर्यवंशी यांचीही उपस्थिती होती. देवदत्त साने यांनी सुत्रसंचालन केले तर आशिष ढोक यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक तसेच जिल्ह्यातील ग्रंथालय संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पुर्वी ग्रंथमहोत्सवातील विविध ग्रंथ प्रदर्शन-विक्रीच्या दालनांचेही मान्यवरांच्या हस्ते फित-कापून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनीही विविध दालनांना भेट देऊन, ग्रंथाचीही माहिती घेतली.
लक्षवेधी ग्रंथदिडी
           ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनापुर्वी सकाळी महात्मा ज्योतीबा फुले पुतळा, आयटीआय चौक येथून आमदार हेमंत पाटील, जेष्ठ साहित्यीक तु. शं. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यीक जगदीश कदम, बी. जी. देशमुख, ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पटने, निर्मलकुमार सुर्यवंशी आदींच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीत राज्यघटना आणि विविध ग्रंथ ठेवण्यात आले होते. टाळ मृदंग, ढोल ताशे, दिंड्या-पताका, वासूदेव यांच्यामुळे ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. वाघ्या-मुरळी, वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगामुळे दिंडीत उत्साहाचे वातावरण होते. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही ग्रंथदिंडीत सहभाग घेऊन, `वाचाल तर वाचाल`च्या घोषणांनी चैतन्य निर्माण केले.

0000000

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

रेल्वे प्रवासांच्या मदतीसाठी 182 हेल्पलाईन नंबर

भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवासांसाठी रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणीचा विचार करून प्रवासांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 182 ची सुविधा देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या सुरक्षासंबंधी, मदतीसाठी हेल्पलाईन नं. 182 वर कॉल करण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे. हा 182 क्रमांक मोबाईल वरुन करता येतो. तसेच इतर फोन वरुनही करता येतो. हा क्रमांक संपूर्ण भारतीय रेल्वेसाठी सारखाच राहणार आहे. आपण कुठूनही या नंबरवर कॉल करून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षासंबंधी मदत मागू शकता येते.

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६