भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवासांसाठी रेल्वे प्रवासादरम्यान
येणाऱ्या अडचणीचा विचार करून प्रवासांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 182 ची सुविधा देण्याचा
निर्णय नुकताच घेतला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या सुरक्षासंबंधी, मदतीसाठी
हेल्पलाईन नं. 182 वर कॉल करण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे. हा
182 क्रमांक मोबाईल वरुन करता येतो. तसेच इतर फोन वरुनही करता येतो. हा
क्रमांक संपूर्ण भारतीय रेल्वेसाठी सारखाच राहणार आहे. आपण कुठूनही या नंबरवर कॉल
करून रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षासंबंधी मदत मागू शकता येते.
सरसम हे गाव हदगाव तालुक्याच्या पुर्वेस 35 कि.मी. अंतरावर असून नांदेड-भोकर-किनवट राज्य महामार्गावर वसलेले गाव आहे. या परिसरातील प्रसिद्ध ठिकाण श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर येथून ईशान्येस 7 कि.मी. अंतरावर आहे. गावाचे क्षेत्रफळ अंदाजे 20.15 हेक्टर आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे 10 हजार आहे. येथील थोर सामाजिक नेते कै.विनायकराव देशमुख काका यांनी गावातील व परिसरातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. उल्लेखनीय एकाच दगडाची 6 फूट उंच हनुमानाची मुर्ती येथील विशेष आकर्षण होय.
गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा