भारतीय रेल्वेने
प्रवासा दरम्यान महिला आणि लहान बालकांना
येत असलेल्या अडचणी लक्षात घेवून ‘जननी सेवा’ या नावाने नवीन सेवा सुरु केली
आहे. याअंतर्गत प्रथम चरणामध्ये सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये महिला आणि बालकांसाठी आहार
ठेवण्यात येणार आहे. ज्यात गरम केलेले दुध, गरम पाणी, सेरेलाक, लाक्तोजेन, बूस्ट, होरलीक्स
तसेच लहान बालकांसाठी इतर खाद्य पदार्थ आणि
महिलांसाठीही विशेष खाद्य पदार्थ ठेवण्यात येणार आहेत.
या
अंतर्गतच नांदेड रेल्वे स्थानकावर डॉ. अखिलेश कुमार सिन्हा, विभागीय रेल्वे
व्यवस्थापक नांदेड विभाग यांनी नांदेड विभागातील पहिल्या ‘जननी सेवा’ केंद्राचे उद्घाटन केले आणि ते जनतेसाठी खुले केले. याप्रकारचे जननी सेवा परभणी,
जालना, औरंगाबाद आणि नांदेड विभागातील
इतर महत्वाच्या रेल्वे स्थानकावर ही सुरु
करण्यात आले. रेल्वे तर्फे आवाहन करण्यात येते की जनतेने याचा लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा