शेतकऱ्यांना दुष्काळ चक्रातून
मुक्त करण्यासाठी
विविध माध्यमातून मदत आवश्यक –
प्रतापराव देशमुख
सरसम, दि. 17 :- शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी विविध माध्यमातून मदत
करण्याची आश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख
यांनी काल (16 मे) येथे केले.
श्री. देशमुख यांच्या 52
वाढदिवसानिमित्त लॉयन्स क्लब नांदेड
यांच्या सौजन्याने मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शिबीर तसेच संदिप पाल
महाराज यांचा व्यसनमुक्तीवर समाजप्रबोधनपर कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी ते बोलत
होते.
श्री. देशमुख म्हणाले की, प्रत्येकाने आयुष्य जगत असतांना काही भाग
समाजासाठी देणे आवश्यक आहे. यातून मनाला मिळणारा आनंद आणि समाधान खूप वेगळे असते.
शेतकरी
शेतीत सर्वस्व टाकून येणाऱ्या पिकावर तो अलंबून राहतो. अन्नधान्याद्वारे आपल्याला
नेहमी तो देतच असतो. शेतकऱ्यांची काळजी घेणे आता सर्वांची जबाबदारी आहे. तरच
त्यांची आर्थिक प्रगती होईल. संताच्या विचार आत्मसात केल्यास गाव सुंदर होण्यास मदत
होवू शकते. प्रत्येक नगारिकांनी स्वावलंबी होणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी यावेळी
व्यक्त केली.
यावेळी विनय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांच्या तपासण्या, शस्त्रक्रिया
करण्यात आल्या. संदिप पाल महाराज यांचा व्यसनमुक्ती कार्यक्रमास नागरिकांचा भरघोस
प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन विजय धोबे यांनी केले. आभार उपसरपंच विलास सुर्यवंशी
यांनी मानले.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा