सरसम ग्रामपंचायत प्रतापराव
देशमुख गटाकडे 11 पैकी 9 उमेदवारांचा बहुमताने
विजय
नांदेड दि. 3 :- हिमायतनगर तालुक्यातील
सरसम ग्रामपंचायत निवडणुकीत माजी बांधकाम, अर्थ समिती सभापती प्रतापराव देशमुख यांच्या
ग्राम विकास पॅनलने 11 पैकी 9 जागा जिंकून स्पष्ट बहूमत प्राप्त केले आहे. मावळत्या
सत्ताधारी ग्रामविकास लोकशाही आघाडी गटाला केवळ दोन जागेवर समाधान मानून पराभव स्विकारावा
लागला आहे.
सरसम ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे
लक्ष लागून होते. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायत कामकाजात भ्रष्टाचार वाढला होता.
गावात अवैध दारु विक्री, नैसर्गिक आपत्ती मधील मदत निधीचा भ्रष्टाचार, पिण्याचे पाणी,
शिक्षण, आरोग्य सेवा अशा अनेक मुलभूत समस्यांनी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
यात विद्यमान सरपंचांची पत्नी कमलबाई कोलमकर यांना देशमुख गटाचे संगिता मिराशे तर माजी
सरपंच सुनील वानखेडे यांना अप्पाराव वानखेडे यांनी पराभूत केले आहे.
श्री. देशमुख म्हणाले की, गावातील विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. सर्वांगीण विकासाची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून नागरीकांच्या सुविधांवर भर दिला जाणार आहे. गावाला नवी दिशा देण्याचे काम केले जाईल. ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त, उत्तरदायी, पारदर्शक, स्मार्ट राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विजयी उमेदवार सौ. संगिता अरविंद धोबे,
विलास सुर्यवंशी, सौ. शशीकला मिलींद नगराळे, संगिता हरिचंद्र मिराशे, दत्ता अडबलवाड,
सौ. सयाबाई सदाशीव कांबळे, अप्पाराव वानखेडे, सुभद्राबाई लक्ष्मण उट्टलवाड, गणेश जाधव
यांची जल्लोषात मिरवणूक काढून मतदाराचे आभार मानले.
00000000
दि. 3 नोव्हेंबर 2015
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा