कापसाची आधारभूत किंमत
योजनेअंतर्गत
धर्माबाद येथे
खरेदी सुरु
नांदेड, दि. 6 :- राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ किंमत आधारभूत
योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात मे. एल. बी. कॉटन कं. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी
धर्माबाद या केंद्रावर शुक्रवार 6 नोव्हेंबर 2015 रोजी कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात
येणार असल्याची माहिती महासंघाच्यावतीने विभागीय व्यवस्थापक एस. जी. हनवते
यांनी दिली आहे.
याबाबतच्या
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार
महासंघ कापूस खरेदी करत असून कापसाचा चुकारा शेतकऱ्यांच्या नावाने आरटीजीएसद्वारे
थेट बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस
आणतांना खरीप हंगाम 2015 मधील पेऱ्याची अद्ययावत नोंद असलेला सात-बाराचा उतारा,
आयएफसी कोड असलेल्या बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची व आधार कार्डची छायांकित
प्रत आणणे बंधनकारक आहे. कापसाला केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषाअन्वये
पुढे नमूद केल्याप्रमाणे दर देण्यात येईल. जात, तंतूची लांबी, तलमता यानुसार हमी
दर पुढील प्रमाणे राहील.
एलआरए 5166-
तंतूची लांबी 26 ते 26.5 -तलमता 3.4 ते 4.9-हमी दर 3 हजार 900 रुपये. एच-4/एच-6-
तंतूची लांबी 27.5 ते 28.5-तलमता 3.5 ते 4.7 -हमी दर 4 हजार रुपये. बन्नी /ब्रम्हा- तंतूची लांबी 29.5 ते 30.5-तलमता 3.5 ते 4.3 -हमी दर 4 हजार 100
रुपये.
कापसाची खरेदी
केंद्र शासनाने कापसाकरीता निर्गमित केलेल्या एफएक्यू नॉर्म्सच्या 24 ऑगस्ट
2015 रोजीच्या आदेशाप्रमाणे केली जात आहे. कापसाची आर्द्रता 12 टक्काच्या वर
असल्यास असा कापूस स्विकारला जाणार नाही. कापूस विक्रीस आणतांना नैसर्गिक
आर्द्रता 8 टक्के पेक्षा जास्त आढळल्यास व तलमता निर्धारीत नॉर्म्स प्रमाणे न
आढळल्यास त्याकरीता केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे किंमतीमध्ये
कपात केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे
नांदेड विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे. 0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा