नांदेड, दि. 6 -
राज्यात प्रायोगीकतत्वावर राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारीत पथदर्शक फळपीक विमा
योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सन 2015-16 साठी द्राक्ष, मोसंबी (आंबिया बहार) व
केळी या पिकांसाठी विमा योजना शासनाने लागू केली आहे. या योजनेत जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व त्यासाठी बँकेत विमा हप्ता भरावा, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. योजनेसाठी बँकेत विमा हप्ता भरण्याची
अंतिम मूदत गुरुवार 10 डिसेंबर असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
पाऊस, तापमान,
सापेक्ष आद्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून
फळपीक विमा योजनेच्या तरतुदी प्रमाणे फळपिकांना निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना
विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे, असे योजनेचे उद्दीष्ट आहे. यामध्ये समाविष्ट
अधिसुचित फळपिके, तालुके व महसूल मंडळे पुढील प्रमाणे आहेत.
फळपीक मोसंबी :- नांदेड- लिंबगाव
व विष्णुपुरी. मुदखेड- बारड. केळी :- नांदेड- तरोडा बु, तुप्पा,
वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर- अर्धापुर, दाभड,
मालेगाव. मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. लोहा-शेवडी बा. भोकर- भोकर. देगलुर-मरखेल,
हानेगाव. द्राक्ष:- नांदेड - तरोड बु, तुप्पा,
वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापूर-अर्धापूर, दाभड, मालेगाव. मुदखेड-मुदखेड, बारड, मुगट. हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. लोहा- शेवडी बा. भोकर- भोकर. देगलूर-मरखेल,
हानेगाव.
जिल्हयातील अधिसुचीत
क्षेत्रावरील अधिसुचीत फळपिकांसाठी विमा संरक्षण देय राहील. द्राक्ष, मोसंबी व केळी
घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. अधिसुचीत फळपिकांसाठी पिक कर्ज
मर्यादा विविध वित्त संस्थाकडे मंजुर आहे अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची
राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील.
अधिसुचीत फळपिकांसाठी
समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी पुढील प्रमाणे. द्राक्ष-
अवेळी पाऊस ( 1 डिसेंबर
2015 ते 31 मार्च 2016 ). मोसंबी
(आंबिया बहार) - अवेळी
पाऊस ( 1 डिसेंबर
2015 ते 31 डिसेंबर 2015 ), जास्त तापमान ( 1 मार्च
2016 ते 31 मार्च 2016 ), जास्त पाऊस ( 15 ऑगस्ट
2016 ते 15 सप्टेंबर 2016 ). केळी- कमी तापमान
( 1
डिसेंबर 2015 ते 29 फेब्रुवारी
2016 ), वेगाचा वारा ( 1 मार्च
2016 ते 31 जुलै
2016 ), जास्त तापमान ( 1
मार्च 2016 ते 31 मे 2016 ).
फळपीक विमा योजनेत
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी
यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले
आहे.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा