नांदेड, दि.23 - भारत सरकारच्या डिजीटल इंडिया वीक अर्थात डिजिटल भारत सप्ताहामध्ये
उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात नांदेड जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरावरील द्वितीय
क्रमांक पटकाविला आहे. या पारितोषिकाचे नवी दिल्लीत सोमवार २८ डिसेंबर २०१५ रोजी
केंद्रीय माहिती तंत्रज्ज्ञान व संचार मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते
वितरण होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निमंत्रित करण्यात आले
आहे.
भारत
सरकारच्या माहिती तंत्रज्ज्ञान व संचार मंत्रालयाच्या माहिती तंत्रज्ज्ञान व ईलेक्ट्रानिक्स
विभाग (डिईआयटीवाय) च्यावतीने १जुलै ते ७ जुलै २०१५ दरम्यान या डिजिटल इंडिया
सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत डिजिटल इंडिया या संकल्पनेतील विविध
घटकांची माहिती नागरिकांपर्यंत
पोहचवण्यासाठीचे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित होते. नांदेड जिल्ह्यात
डीजीटल इंडीया वीक अंतर्गत डीजीटल लॉकर तयार करण्याचा नागरिकांसाठी कॅम्प तसेच
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डीजीटल इंडीयाचे कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्हास्तरीय अनेक कार्यालयात डिजिटल इंडीया अंतर्गत कार्यान्वित
विविध संगणक प्रणालींचे सादरीकरण करण्यात आले.
डिजिटल लॉकर, जीवन प्रमाण प्रणाली, आधारव्दारे
बायोमॅट्रीक अटेंडन्स आणी अन्य प्रणालींचे प्रशिक्षण देण्यास तालुकास्तरीय मास्टर
ट्रेनर्स तसेच महा-ई-सेवा केंद्रांचे तालुकास्तरीय प्रतिनीधी यांना प्रशिक्षण
देण्यात आले. DIT
यांनी प्रदर्शीत केलेल्या
डीजीटल इंडीयाच्या चित्रफीती गावपातळीवर अनेक महासेवा केंद्रामार्फत नागरीकांना
दाखविण्यात आल्या.
प्रत्येक उपक्रमाची माहिती ऑनलाईन पोर्टलवर
भरण्यात आली होती. त्या माहिती नुसार राज्यनिहाय उत्कृष्ट नियोजन, संयोजन आणि जाणीव जागृतीमध्ये उत्कृष्ट प्रयत्नांची दखल घेऊन
त्यातून प्रत्येक
राज्यातून तीन जिल्ह्यांना पारितोषिक देण्यात आले. त्यानुसार
नांदेड जिल्ह्याने द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक पटकावले आहे.
राज्यात जालना जिल्ह्यास प्रथम तर रायगडला तृतीय
क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. .
नवी
दिल्ली येथे सोमवार २८ डिसेंबर,२०१५ रोजी “गुड गव्हर्नन्स डे” निमित्त होणाऱ्या विशेष
कार्यक्रमात केंद्रीय
माहीती तंत्रज्ञान व संचार मंत्री श्री. रवी शंकर प्रसाद
यांचे हस्ते स्टेन आँडीटोरीयम येथे होणाऱ्या
कार्यक्रमात हे पारितोषिक वितरीत केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी
सुरेश काकाणी यांना निमंत्रित करण्यात आले असून सोबत नांदेड
एनआयसीचे डिआयओ सुनिल पोटेकर यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी
श्री. काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी
उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी डीजीटल इंडीया वीकचे नियोजन केले त्याप्रमाणे
जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी पोटेकर यांनी विविध
उपक्रम राबविले. यासाठी नीरज धामणगावे, ईडीपीएम नांदेड व संतोष निल्लेवार यांनी
परीश्रम घेतले आहेत. डीएचक्यू ज्ञानेश्वर रांजणे आणी त्यांचे तालुकास्तरीय
टीएचक्यू यांनी तालुकास्तरीय कार्यक्रमाची जबाबदारी घेतली होती.
या सर्वांचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी अभिनंदन केले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा