नांदेड, दि. 6 – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलातर्फे आयोजित
कार्यशाळेसाठी जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर मंगळवार 8 व बुधवार 9
डिसेंबर 2015 रोजी नांदेड येथे येत आहेत. त्यानिमित्ताने नांदेड येथील विद्यार्थी,
पालक व विज्ञान प्रेमी नागरीकांसाठी भौतिकशास्त्र संकुलातर्फे डॉ. जयंत नारळीकर
यांचे मंगळवार 8 डिसेंबर 2015 रोजी सायंकाळी 5.30 वाजता विद्यापीठ परीसरात
व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय “विश्वात आपण एकटेच आहोत का ?” हा असून हे व्याख्यान मराठीतून
असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे
आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या
व्याख्यानासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु डॉ.
जनार्धन वाघमारे, पंडीत रवीशंकर शुक्ल विद्यापीठ, रायपूर येथील कुलगुरु डॉ. एस. के.
पांडे व इतरही सहा ते सात नामांकीत शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. व्याख्यान
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोर आयोजित करण्यात आले असून या व्याख्यानाचा
लाभ इच्छुकांना घेता यावा म्हणून शहरातून बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
व्याख्यानाचा विद्यार्थी, संशोधक,
अभ्यासक, विज्ञानप्रेमी नागरीक आदींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरु डॉ. पंडीत
विद्यासागर, कुलसचिव बी. बी. पाटील, भौतिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. आर. एस.
खैरनार, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एम. के. पाटील, डॉ. एस. सी. कुंभारखाने, डॉ. एम.
पी. महाबोले, डॉ. आर. एस. माने, डॉ. ए. व्ही. सरोदे, डॉ. के. ए. बोगले आदींनी केले
आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा