नांदेड दि. 16 :-महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट
छायाचित्रकारांसाठीच्या केकी
मूस पुरस्काराला
दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱे छायाचित्रकार विजय होकर्णे यांचा आज गुरुवार 17 डिसेंबर,
2015 रोजी नांदेड येथील विविध संस्था व मित्र
परिवारातर्फे अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात
आला आहे. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अभिनंदन सोहळा
समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
नांदेडच्या महापौर
सौ.
शैलजा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली
व जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या
हस्ते आज गुरुवारी 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. कुसुम सभागृहात
होणाऱ्या कार्यक्रमात विजय
व सौ.
अरुणा होकर्णे यांना गौरविण्यात
येणार आहे. याच
कार्यक्रमात श्री. होकर्णे यांच्या छायाचित्रण वाटचालीविषयीची ` विजय होकर्णे-द टॅाप अँगल` ही चित्रफीतही प्रदर्शित
करण्यात येणार आहे.
श्री. होकर्णे यांनी
केकी मुस पुरस्कार दुसऱ्यांदा पटकविला
आहे. नुकताच मुंबई येथे सह्यादी अतिथीगृह येथे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात
आला आहे. या अभिनंदनास्पद
कामगिरीसाठी श्री. होकर्णे यांचा अभिनंदन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ
पत्रकार निशिकांत भालेराव, कर्नल समीर
राऊत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक राधाकृष्ण
मुळी, माजी उपमहापौर सुनील नेरळकर, पत्रकार संजीव कुळकणी, महाराष्ट्र विरशैव सभेचे नांदेडचे अध्यक्ष राजेंद्र हुरणे, जेष्ठ
उद्योजक गणपतराव मोरगे व मराठवाडा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील
हंगरगेकर आदींची उपस्थिती राहणार
आहे.
या कार्यक्रमास पत्रकार, छायाचित्रकार,
तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने
उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीचे दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू
डोईफोडे, उद्योजक सतीश सामते, उमाकांत जोशी, योगेश
जायस्वाल, सांस्कृतिक मंचचे लक्ष्मण संगेवार, नांदेड क्लबचे सचिव
ओमप्रकाश वर्मा, क्रेडाईचे अध्यक्ष रवी कडगे, महाराष्ट्र
वीरशैव सभेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष अविनाश मारकोळे पाटील, मराठवाडा फोटोग्राफर्स असोसिएनचे कार्याध्यक्ष आर. म. सुर्वे यांनी
केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा