नांदेड,
दि. 13 :- नांदेड जिल्ह्यात 12 डिसेंबर
रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीस उत्सफुर्त
प्रतिसाद मिळाल्याने जिल्ह्यातील 2 हजार 587 प्रकरणे तडजोडीने
निकाली काढण्यात आली. यात
तडजोड दंड-वसुली आदी प्रकरणी 6 कोटी 75 लाख
18 हजार 700 रुपयांच्या वसुलीचे आदेश पारीत करण्याची आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्यावतीने
देण्यात आली. मोटार वाहन अपघात प्रकरणात सर्वाधिक
3 कोटी 32 लाख 85 हजार 500 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
नांदेड
जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या न्यायालयाच्या
ठिकाणी व नांदेड येथील
जिल्हा न्यायालयाच्या परिसरात
राष्ट्रीय लोकअदालतीचे
आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयाचे उद्धाटन
प्रमुख जिल्हा व सत्र
न्यायाधीश सविता टी. बारणे यांच्या
हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत
करण्यात आले होते. जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाने या लोकअदालतीत जिल्ह्यातील प्रलंबित
खटले आणि दावा दाखलपूर्व
खटले मिळून अशी 17 हजार 835 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली
होती.
राष्ट्रीय
लोकअदालतीत तडजोडीने निकालात काढण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या (कंसात तडजोडीपोटीच्या
रक्कमा )- मोटार वाहन अपघात-121 ( 3 कोटी 32 लाख 85 हजार 500), भूसंपादन-101 ( 1 कोटी
13 लाख 29 हजार 358 ), बँक-175 ( 76 लाख 42 हजार 957), सहकार न्यायालय-13 ( 67 लाख
4 हजार 580), एनआयॲक्ट-93 (28 लाख 13 हजार 504), दूरसंचार-389 (8 लाख 85 हजार 371),
फौजदारी-329 (7 लाख 67 हजार 537), दिवाणी-285 (7 लाख 67 हजार 276), नगरपालिका-168
(7 लाख 71 हजार 01), वीज चोरी-पाणी इत्यादी-77 (4 लाख 1 हजार 466), ग्राहक वाद-6
(3 लाख 52 हजार 500), कामगार-29 (1 लाख 90 हजार ), औद्योगिक-15 (14 लाख 20 हजार), व
अन्य अशा एकूण 2 हजार 587 प्रकरणात 6 कोटी 75 लाख
18 हजार 700 रुपयांच्या वसुलीचे आदेश पारीत करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा